
बेळगाव—belgavkar—belgaum : किणये येथील पीडीओला जाब विचारणाऱ्या मराठी तरुणाचा सत्कार केला म्हणून म. ए. समिती नेते शुभम शेळके (वय 30) यांना सोमवारी माळमारुती पोलिसांनी मिरज येथे अटक केली होती. सोमवारी सायंकाळी त्यांना बेळगावला आणून घाईगडबडीने न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली होती.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
शुभम शेळके (राहणार अंजनेयनगर) यांच्याविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत एफआयआर दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी तीन दिवसांपासून धडपड सुरु केली होती. सोमवारी मिरज येथे अटक करून त्यांना बेळगावला आणण्यात आले. समिती नेते शुभम शेळके यांना पोलिसांनी राऊडी शिटर (rowdy sheeter) ठरविले आहे. शेळके यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीच 12 गुन्हे दाखल झाले असल्याने राऊडी शिट उघडण्यात आली आहे.
समिती कार्यकर्त्यांना पोलिसांकडून राऊडी शिटर ठरविले जात असल्याने सीमाभागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, या मागणीसाठी लढा देत आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून लढे देण्यात येत असले तरी पोलिसांकडून समिती नेते आणि कार्यकर्त्यांवर सुरुवातीपासूनच गुन्हे दाखल केले जात आहेत. याचा परिणाम सीमालढ्यावर होत आहे. सोमवारी सायंकाळी त्यांना मिरज येथून अटक करण्यात आली. त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
जामीन मिळालाशुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी सोमवारी अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश (DCP) यांच्या न्यायालयात झाली. शेळके यांना जामीन मिळावा यासाठी अॅड. महेश बिर्जे यांनी मंगळवारी पोलीस उपायुक्तांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी शुभम शेळके यांना जामीन मंजूर केल्यामुळे सायंकाळी हिंडलगा कारागृहातून सुटका झाली आहे. यावेळी अनेक समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
