@महाराष्ट्र मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता

महाराष्ट्र मशिदीत स्फोट
आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता

स्फोटापूर्वी जेलिटीनच्या कांड्यासह व्हिडिओ पोस्ट Video

Explosion inside mosque in Maharashtra : मशिदीत स्फोट घडवण्याआधी 'अंगार-भंगार नाय रं' गाण्यावर बनवला रील, 'त्या' दोन आरोपींची नावं समोर

explosion-in-mosque-in-gevrai-taluka-2-accused-arrested-tense-peace-in-the-village-beed-masjid-blast-explosion-inside-mosque-in-beed-2-arrested-202503.jpg | @महाराष्ट्र मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता | belgaum news | belgavkar बेळगावकर
महाराष्ट्र : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासह विविध प्रकरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. आता याच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीतस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील अर्धमसला गावातील मशिदीत शनिवार/रविवारी मध्यरात्री हा स्फोट झाला. 

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
गुढी पाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच ही घटना घडल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट उघडवून आणल्यामुळे मशिदीची भिंत कोसळली, तसेच मोठा खड्डाही पडला. सुदैवाने या सौम्य स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे  गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी आयजी, पोलीस अधीक्षकांसह तलवाडा पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
अटकेपूर्वी बनवला व्हिडिओ : या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे, असे दोन आरोपींची नावे आहेत. स्फोटापूर्वी विजय गव्हाणे याने सोशल मीडियावर जिलेटीनच्या कांड्यासह स्वतः चा व्हिडिओ पोस्ट केला होता. हातात जिलेटिनच्या काठ्या आणि तोंडात सिगारेट घेऊन तो व्हिडिओ बनवत होता. उद्या रमजान ईद असल्यामुळे पोलिसांनी मुस्लिम समुदायाला शांत राहण्याचे आणि कुठल्याही अफवांवर विश्वासन ठेवण्याचे आवाहन केले आहे. 
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
वरिष्ठ पोलीस अधकाऱ्यांनी केला पंचनामा रमजानच्या काळात मशिदीत असा स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्याचे एसपी आणि छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा केला. आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. 
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
या व्हिडीओला आरोपीने 'आपलं कॉन्टॅक्ट जबर, तुला नाही खबर' या गाण्याचं एक कडवं जोडलं आहे. आपलं कॉन्टॅक्ट जबर, तुला नाही खबर... कधी काळी ढगात जाशील... नडायच्या वार्ता करू नकोस तू, फोटोत चिपकून राहशील... दोस्ताच्या मनातला दिलदार राजा मी... पॉवर दमदार हाय रं... शिस्तीत राहा बेट्या, उडू नको ज्यादा, मी अंगार भंगार नाय रे, असे लिरिक्स असलेला व्हिडीओ आरोपी इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Explosion in mosque in Gevrai taluka; 2 accused arrested tense peace in the village Beed Masjid Blast Explosion inside mosque in Beed; 2 arrested

@महाराष्ट्र मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता
स्फोटापूर्वी जेलिटीनच्या कांड्यासह व्हिडिओ पोस्ट Video

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm