बेळगाव—belgavkar—belgaum : मदीहळ्ळी (ता. हुक्केरी) येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे (मूर्तीचे) अनावरण शुक्रवारी (ता. 4) सायंकाळी बसस्थानकानजीक होणार आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
आमदार निखिल कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत पुतळा अनावरण माजी खासदार रमेश कत्ती हस्ते होईल. अभिनव मंजुनाथ स्वामी, ऋषिकेशनंद बाबा यावेळी उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा 8 फूट उंच असून, बेळगावचे मूर्तिकार विनायक पाटील यांनी बनविला आहे. या कार्यक्रमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
