बेळगाव : डीकेशि कर्नाटक प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार.?

बेळगाव : डीकेशि कर्नाटक प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार.

change of guard in KPCC
सतीश जारकीहोळी प्रयत्नशील

Karnataka Pradesh Congress Committee (KPCC) president : जातीय राजकारण

बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नियुक्तीविषयी दिल्लीमध्ये चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हे पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या जागी कार्याध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करणारे वीरशैव लिंगायत नेते ईश्वर खंड्रे यांच्या नियुक्तीची शक्यता आहे. त्यातच आता मंत्री सतीश जारकीहोळी आणि एम. बी. पाटील यांनीही प्रयत्न सुरु केले असून याबाबतच्या निर्णयास विलंबाची शक्यता आहे.
logo
Pay Yearly ₹ 100
₹ 100 एक वर्ष
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह इतरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शिवकुमार यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याचे वरिष्ठांना सांगितले आहे. रिक्त होणाऱ्या या जागेवर आता ईश्वर खंड्रे यांच्या नियुक्तीबाबत चर्चा केली जात आहे. श्रेष्ठींनी याविषयी खंड्रे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. अखिल भारतीय वीरशैव महासभेचे ते राज्याध्यक्ष आहेत. उत्तर कर्नाटकातील प्रभावी नेते आहेत. वरिष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल यांनीही ईश्वर खंड्रे यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या ते वनमंत्री आहेत. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती योग्यरित्या पार पाडता येईल, असे खंड्रे यांनी कळवले आहे.
logo
Pay for 5 Month ₹ 50
₹ 50 पाच महिने
श्रेष्ठींनी होकार दिल्यानंतर खंड्रेची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे. पण, त्यांच्या मंत्रिपदाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. याविषयी उच्चस्तरीय बैठक घेऊन ठरवले जाणार आहे. पक्षामध्ये एका नेत्याला एकच पद असा नियम आहे. देशात सर्वत्र हाच नियम आहे. पण, गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकाच्या बाबतीत हा नियम थोडा शिथिल केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री असतानाही डी. के. शिवकुमार प्रदेशाध्यक्षपदी कायम राहिले. आता आणखी कार्यकाळ वाढवून मिळणार नसल्यचा संदेशत्यांना देण्यात आला आहे.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
उद्योगमंत्री एम. बी. पाटील पाटील यांनी आपण वीरशैव लिंगायत समाजातील असून प्रदेशाध्यक्षपद सांभाळ्याची तयारी असल्याचे श्रेष्ठींना सांगितले आहे. या पदासह मंत्रिपदावरही कायम राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनीही प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळल्याचा अनुभव आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सध्या प्रभावी समाजातील नेत्यावरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे वाल्मिकी समाजातील सतीश जारकीहोळी यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची मागणी श्रेष्ठींकडे केल्याचे समजते
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 100
₹ 100 एक वर्ष
logo
Pay for 5 Month ₹ 50
₹ 50 पाच महिने
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news Section wants DK Shivakumar out as Karnataka Congress chief

belgaum Karnataka Pradesh Congress Committee KPCC president belagavi

बेळगाव : डीकेशि कर्नाटक प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार.?
change of guard in KPCC; सतीश जारकीहोळी प्रयत्नशील

Support belgavkar