
बेळगाव—belgavkar—belgaum : 20 गुंठे जागेच्या वादातून भावा-भावांमध्ये शस्त्रास्त्रांनी हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास आंबेवाडीत घडली होती. यामध्ये एकूण 7 जण जखमी झाले. संजय राक्षे यांच्यासह चौघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
रात्री वीजपुरवठा खंडित झालेला असताना तलवारी व इतर शस्त्रांसह संजय व इतरांवर हल्ला करण्यात आला. संजय यांना मारहाण केल्याने त्यांच्या पायाचे हाड मोडले आहे. इतर तिघांवर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. लीज संपल्याने जमीन परत मागितल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे समजते.
यल्लाप्पा राक्षे, लखन राक्षे उदय राक्षे, सविता राक्षे, गोविंद राक्षे यांच्यासह अन्य काही जणांमधील हा वाद आहे. दोन्ही बाजूंकडील एकूण 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जागेच्या वादातून आंबेवाडीत झालेल्या मारहाण प्रकरणी एका गटातील दोघांना काकती पोलिसांनी अटक केली. यल्लाप्पा राक्षे व लखन राक्षे (दोघेही रा. आंबेवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
रविवारी रात्री आठच्या सुमारास आंबेवाडीत 20 गुंठे जागेच्या वादातून भाऊबंदकीत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन एकमेकांवर धारदार शस्त्रांसह काठीने हल्ला केला होता. यामध्ये दोन्ही गटांमधील सातजण जखमी झाले होते. या प्रकरणाची काकती पोलिसांनी दखल घेऊन नोंद करुन घेतली. याबाबत काकतीचे निरीक्षक सुरेश शिंगे अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी एका गटातील दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु असून आणखी काहींना लवकरच अटक केली जाईल.
