बेळगाव : आता ते खासदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत...

बेळगाव : आता ते खासदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीबाबतचे त्यांचे वक्तव्य अशोभनीय

बेळगाव : माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी 30 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये राहून विविध पदे अनुभवली आहेत. आता ते बेळगावचे खासदार होण्याचे स्वप्न पाहत असून त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी चिक्कोडी लोकसभा व चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील काम पाहावे. बेळगावच्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी हस्तक्षेप करणे योग्य नाही. लोकसभा पोटनिवडणुकीबाबतचे त्यांचे वक्तव्य अशोभनीय असल्याचे मत केपीसीसी कार्याध्यक्ष व आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
जारकीहोळी म्हणाले, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींवर आहे. आहे. 30 वर्षे काँग्रेसमध्ये राहून त्यांनी सत्ता उपभोगली आहे. उतरत्या वयात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे सोडून पक्षविरोधी कारवाई करण्याचा संकेत दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पक्ष दुबळा नसून राज्य व केंद्रात काँग्रेसची सत्ता नसली तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असूनही माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी पक्षविरोधी कार्य करण्याचे जाहीर केल्याने त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून योग्य ती कारवाई केली जाईल. माजी खासदार हुक्केरी यांनी चिक्कोडी लोकसभा व चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदार संघापुरते काम पाहून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडावी. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची, हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव : काँग्रेसचे माजी खासदार भाजपकडून लढविण्यास इच्छुक - बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

नाहीतर अंगडी कुटुंबातील व्यक्तीला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनिनंतर लोकसभेची जागा रिक्त आहे. दरम्यान अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रतिस्पर्धी नसल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केले आहे. याचबरोबर हुक्केरी यांनी काँग्रेस किंवा भाजप कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे वक्तव्य केले आहे. अंगडी यांचे व आपले कौटुंबीक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपल्याला अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भाजपाने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, तर त्याच्या विजयासाठी मी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करणार आहे. असे करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर काहीही कारवाई केली तरी त्याची मला पर्वा नाही. अंगडी यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणालाही उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला तर आपण ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल, त्या पक्षाकडून बेळगाव लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे मत माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी काल व्यक्त केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आता ते खासदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीबाबतचे त्यांचे वक्तव्य अशोभनीय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm