बेळगाव—belgavkar—belgaumनवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव विभागाच्यावतीने भव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. दुर्गामाता दौडला दरवर्षी प्रतिसाद वाढत असून दरवर्षी नऊ दिवस दौडीचे आयोजन केले जाते. पण यंदा अकरा दिवस दौड असणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दुर्गामाता दौडीचे मार्ग घोषित केले आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
सोमवार दि. 22 सप्टेंबर : श्री शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर पर्यंत दुर्गामाता दौड
मंगळवार दि. 23 : चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिर ते किल्ला येथील दुर्गामाता मंदिर
बुधवार दि. 24 : शिवतीर्थ (मिलीट्री महादेव मंदिर) ते धर्मवीर संभाजी चौक (जत्तीमठ)
गुरुवार दि. 25 : धर्मवीर संभाजी चौक ते संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरपर्यंत
शुक्रवार दि. 26 : खासबाग येथील बसवेश्वर सर्कलमधील दुर्गामाता मंदिर ते वडगाव येथील मंगाई मंदिरापर्यंत
शनिवार दि. 27 : हरिद्रा गणेश मंदिर सदाशिवनगर ते शिवबसवनगर जोतिबा मंदिरापर्यंत
रविवार दि. 28 : शहापूर येथील अंबामाता मंदिर ते गोवावेस बसवेश्वर सर्कलपर्यंत
सोमवार दि. 29 : श्री शिवाजी उद्यान ते दुर्गामाता मंदिर (जत्तीमठ) ते शिवाजी उद्यानशिवाजी उद्यानपासून प्रारंभ होऊन एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाण पूल, स्टेशन रोड, हेमू कलानी चौक, रामलिंगखिंड गल्ली, जत्तीमठ येथील दुर्गामाता मंदिरमार्गे शिवाजी उद्यान येथे सांगता होणार आहे.
मंगळवार दि. 30 : टिळकवाडीतील शिवाजी कॉलनी ते अनगोळ येथील महालक्ष्मी मंदिरपर्यंत
बुधवार दि. 1 ऑक्टोबर : ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर ते शनि मंदिरपर्यंत
दि. 2 ऑक्टोबर रोजी मारुती गल्ली येथील मारुती मंदिर ते धर्मवीर संभाजी चौकपर्यंत दुर्गामाता दौडधर्मवीर संभाजी चौकात दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दि. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत भव्य दुर्गामाता दौड यशस्वी केली जाणार आहे. धर्माचा प्रचार व प्रसार करणारे उत्तम वक्ते तसेच स्वराज्यातील मावळ्यांचे वंशज बेळगावला आणण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेळगावच्या बैठकीत करण्यात आला.
