बेळगाव—belgavkar—belgaum
खानापूर तालुक्यातील मेंढेगाळी येथे ग्रामदेवता कालिका देवीची दरवर्षीप्रमाणे यात्रा व तुळशी विवाह सोहळा बुधवारी (ता. 5) भक्तिभावात साजरा होणार असून, दुसऱ्या दिवशी खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे (नाव नोंदणीसाठी संपर्क : 9921233586, 8329799768)
यात्रा सोहळ्याची ग्रामस्थांनी उत्साहात तयारी केली असून, देवी मंदिर परिसरात सुंदर सजावट, विद्युत रोषणाई व भजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी (ता. 5) सकाळी 6 ते 7 वाजता देवीचा महाअभिषेक, दुपारी धार्मिक विधी, संध्याकाळी 5 वाजता थळ देवस्थानाकडे ग्रामस्थांचे प्रस्थान, संध्याकाळी 7 वाजता महाआरती, रात्री 8 वाजता तुळशी विवाह सोहळा, रात्री 9 ते 10.30 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम व रात्री भजन सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मायाप्पा सोंगी भजनी मंडळ, मलतवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांचे 'गजर सोगावा जागर लोककलेचा' हे भक्तिमय व विनोदी सादरीकरण होईल. पहाटे 5.30 वाजता काकड आरती व प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होईल.
दरम्यान, गुरुवारी (ता.6) सायंकाळी 6 वाजता कालिका देवी कमिटीच्या वतीने भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हौशी नृत्य स्पर्धकांनी सहभागी होऊन कलागुणांचे सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धा खुल्या गटात घेण्यात येणार असून, विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिले बक्षीस 15,000 रुपये, दुसरे बक्षीस 12, 551 रुपये, तिसरे बक्षीस 8,551 रुपये, चौथे बक्षीस 6,551 रुपये, पाचवे बक्षीस 5,551 रुपये, अशी एकूण 20 विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन 'कालिका देवी उत्सव समिती', मेंढेगाळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे बुधवार, दि. 05/11/2025 रोजी श्री कलिका देवीची यात्रा व तुळशी विवाह सोहळा करण्याचे योजिले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी, पाहूणे मंडळी व मित्रमंडळींनी अगत्य येण्याचे करावे. तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
कार्यक्रमाची रुपरेषा *
सकाळी 6 ते 7 वा.
: सकाळी देवीचा महाअभिषेक होईल.
दुपारी दु. 1.00 ते 5 पर्यंत :
देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल.
संध्याकाळी 5.00
: थळ देवस्थानाकडे भजनीमंडळ व ग्रामस्थ मंडळी प्रस्थान होईल त्यानंतर तेथील कार्यक्रम आटपून पुढील कार्यक्रम सुरुवात होईल.
संध्याकाळी 7 ते 8 वा.
: श्री कालिका देवीची महाआरती होईल.
रात्री 8 ते 9 वा.
: तुळशी विवाह सोहळा संपन्न होईल.
रात्री 9 ते 10.30 वा.
: महाप्रसादाचा कार्यक्रम होईल त्याचा सर्व ग्रामस्थांनी, पाहूणे व मित्र मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
रात्री 10.30 ते 5.30
: सोंगी भजन श्री मायाप्पा सोंगी भजनी मंडळ मलतवाडी ता. चंदगड, जि. कोल्हापूर गजर सोगावा जागर लोककलेचा... भक्तीमय कौटूंबिक विनोदी, डान्सीकल भारुड भजनी मंडळ
पहाटे 5.30 ते 6.30 वा. काकड आरती होईल त्यानंतर प्रसाद वाटप होईल. नंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
गुरुवार दि. 06/11/2025 रोजी सायंकाळी 6.00 वा भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा.
