बेळगाव—belgavkar—belgaum
बेळगावमध्ये पहिल्यांदाच मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगावच्या वतीने शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी बोलताना शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे प्रमुख माजी आमदार श्री नितीन राजे शिंदे म्हणाले प्रतापगडाचा रणसंग्राम म्हणजे स्वराज्यावर चालून आलेल्या दहशतवाद्याला कसे संपवावे हे शिवरायांनी दाखवून दिले आहे,
सर्व हिंदुनी जात, भाषा, पंत बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजेत. तसेच प्रतापगडावरील अफजल खानाच्या उदात्तीकरण करण्याचा प्रकार कसा उध्वस्त केला याचा इतिहास त्यांनी कथन केला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक श्री धनंजय जाधव, दक्षिण चे आमदार श्री अभय पाटील, माजी आमदार श्री अनिल बेनके, हिंदुत्ववादी नेते श्री पंडित ओगले, बेळगावचे महापौर श्री मंगेश पवार आदींनी आपले विचार मांडले.
व्यासपीठावर माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, युवराज जाधव, चव्हाट गल्लीचे श्री मोहन किल्लेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सांबरा येथील भाजपा नेते विक्रम सोनजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सहकाऱ्यांसोबत अफजल खानचा वध याचा आकर्षक जिवंत देखावा सादर केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक राजू भातकांडे, शरद पाटील, नारायण पाटील, संजय गुंडकल, सत्यम नाईक, प्रवीण महेंद्रकर सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष जैनोजी यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवप्रेमी मातभागिनी उपस्थित होते.
