बेळगाव—belgavkar—belgaum
मागील अनेक दिवसांपासून अतिवाड बस अनियमितपणे सोडण्यात येत आहे. याचा फटका प्रामुख्याने विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे संतप्त बनलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले.
परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी अ. भा. विद्यार्थी परिषद व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढली. अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे सूचविले. त्यानुसार अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा करण्यात आली.
बेळगाव येथून अतिवाडला बससेवा आहे. परंतु ही बस अनियमित धावते. वाहक, चालक यांची मनमानी वाढली आहे. याचाफटका विद्यार्थ्याना बसतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अचानक बस बंद करण्यात येते. यामुळे बसची प्रतीक्षा करत विद्यार्थ्यांना थांबावे लागते. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा फटका बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. बससेवा सुरळीत करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी समाजसेवक यतेश हेब्बाळकर, साई भोसले, संदीप ताशिलदार, नीळकंठ मेणसे, शिवसम्राट भोसले आदीसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
