बेळगाव—belgavkar—belgaum
कोनवाळ गल्ली येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामा शिंदोळकर (वय 86) यांचे निधन झाले.
समितीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सातत्याने पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी शनिवार दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे.
