बेळगावच्या जिगरबाज साहिलला सलाम...  एक हात नसतानाही खानापूरात वाचविले बुडणार्‍याचे प्राण

बेळगावच्या जिगरबाज साहिलला सलाम... एक हात नसतानाही खानापूरात वाचविले बुडणार्‍याचे प्राण

belgavkar.com | belgaum | belgavkar

दादा मला वाचव अन्.... 2013 गणेशोत्सव मिरवणूकीवेळी शाॅक लागून हात गमवला होता.

बेळगाव : खानापूरातील असोगा येथे पाणी अडवलेल्या पुलाजवळ पोहताना बुडणार्‍या त्याच परिसरातील एका युवकाला बेळगावच्या जिगरबाज युवकाने एक हात नसतानाही जिद्दीच्या जोरावर वाचविले आहे. साहिल शिवराम काजुकर (वय 23, रा. सदाशिवनगर, बेळगाव) असे त्या बेळगावच्या युवकाचे नाव आहे. 2013 च्या बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूकीवेळी शाॅक लागून त्याला त्याचा उजवा हात गमवावा लागला होता. एक हात नसतानाही त्याने त्या युवकाला वाचविल्याची घटना असोगा येथे मंगळवारी दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
sahil-kajukar.jpg | बेळगावच्या जिगरबाज साहिलला सलाम...  एक हात नसतानाही खानापूरात वाचविले बुडणार्‍याचे प्राण | belgaum news | belgavkar बेळगावकर
युवकाला वाचविणारा आणि एक हात गमावलेला साहिल काजुकर
दोन युवक मंगळवारी पोहत होते. तर एकटा पाण्याच्या बाजुला थांबला होता. त्यानंतर तोही पाण्यात उतरला. पण परफेक्ट त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला. साहिल व त्यांचे घरचे त्याठिकाणी देवाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याठिकाणी साहिलही पोहत होता. तो युवक बुडू लागल्याने त्याने वाचविण्यासाठी आरडाओरड केली. यावेळी त्या बुडणार्‍या युवकाच्या दोघाही मिञांनी घाबरून त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला नाही. बुडणार्‍या युवकाने त्यावेळी साहिलला दादा मला वाचव........ अशी हाक मारली. पण साहिलला विचार करावा लागला. कारण त्याचा उजवा हात नाही पण त्याने पोहण्यात अनेक पदके जिंकलेली आहेत. यावेळी साहिलने त्याच्या एका मिञाकडे मदत माघितली. त्या दुसर्‍याने युवकाने बुडणार्‍या युवकाला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण त्यालाच तो बुडणारा युवक घाबरल्याने आत खेचू पाण्यात लागला. त्यामुळे दुसरा युवकही स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बाजुला झाला.
घटना घडण्यापूर्वी पोहताना युवक आणि साहिल YouTube Video
यावेळी साहिलकडे एकच पर्याय होता की त्या बुडणार्‍या युवकाला वाचवावे. त्यानंतर साहिलने न घाबरता त्या युवकाला एका हाताने कंबरेला पकडत हळू हळू ढकलत 200 - 250 फूट अंतर पार केले आणि त्याचा जीव वाचविला. त्याला हळूहळू पाण्याच्या बाहेर काढले. अन् अखेर बेळगावच्या युवकाने त्याचे प्राण वाचविले. साहिल भावाला belgavkar.com च्या वतीने सलाम. belgavkar.com च्या वतीने बेळगाव जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की अशा युवकांना मदत करावी व त्याला ताबडतोब गणेशोत्सवेळी झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई द्यावी.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या जिगरबाज साहिलला सलाम... एक हात नसतानाही खानापूरात वाचविले बुडणार्‍याचे प्राण
दादा मला वाचव अन्.... 2013 गणेशोत्सव मिरवणूकीवेळी शाॅक लागून हात गमवला होता.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm