बेळगाव : कोरे गल्ली, शहापूर येथील सरस्वती वाचनालयातर्फे 15 वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमाला गुरूवार 25 व शुक्रवार 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेत राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद गायकवाड यांची दोन व्याख्याने होणार आहेत.
25 फेब्रुवारी रोजी 'महाकवी ते सावरकर आणि 26 रोजी 'सावरकरांची जन्मठेप' या विषयांवर प्रा. गायकवाड बोलणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राजे हरिहरराव पटवर्धन उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी कळविले आहे.