बेळगाव : विविध संस्थांना भरघोस देणगी; बचत केलीली पेन्शन संस्थांना

बेळगाव : विविध संस्थांना भरघोस देणगी;
बचत केलीली पेन्शन संस्थांना

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावच्या लेखिका व बालिका आदर्श शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आशा रतनजी यांनी आपले पती कै. रुस्तम रतनजी यांच्या नावे विविध संस्थांना भरघोस देणगी दिली आहे. त्यांच्या तीन मुलांनी बेळगावातील ज्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतले ती सेंट पॉल्स शाळा, जीएसएस, जेएनएमसी, मराठा मंडळ डेंटल कॉलेज, केएलई डेंटल कॉलेज, केएलई इंजिनिअरिंग कॉलेज, आरएल लॉ कॉलेज यांना दरवर्षी प्रत्येकी 17 हजार रुपये देणगी मिळेल, अशी सोय केली आहे.
त्यांचे स्वत : चे शिक्षण झालेली महिला विद्यालय शाळा, त्यांनी सेवा बजावलेली बालिका आदर्श विद्यालय तसेच मंथन संस्था, सरस्वती वाचनालय, लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्य संघ, कन्याकुमारी येथील विवेकानंद संघ अशा सर्व संस्थांना मिळून 2 लाख रुपयांची देणगी त्यांनी दिली आहे. दरवर्षी 1 लाख 85 हजार ते 2 लाख पर्यंत देणगी देण्याची योजना आखलेली आहे. ही देणगी या संस्थांना बँकेमार्फत थेट दरवर्षी मिळणार्‍या व्याजातून दिली जाईल.
आशा रतनजी यांचा मोठा मुलगा डॉक्टर जूबीन यांच्या एका वाक्यानं त्यांना प्रेरणा ही दिली आहे. आणि दुसरा मुलगा डॉक्टर झरिर यांनी याला सहमती दर्शवली म्हणून गेली 6 वर्ष दरमहा पेन्शनमधून बचत केलेली शिल्लक रक्कम ठेवून व तिसरा मुलगा मेहनोष यालाही कल्पना देऊन ही योजना कार्यान्वित केली. पती निधनानंतर मैत्रिणींनी खूप मदत केली, विशेषता मुलांच्या उच्च शिक्षणासाठी डॉक्टर नीता देशपांडे, मिलन मुतकेकर, गुलाब कारेकर (तनवी वेलंग) यांच्या मदतीची त्या आदरपूर्वक आठवण काढतात. सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हे करता आले हे त्या आवर्जून सांगतात.
बँकाच्या खात्यातून (त्या ह्या जगात असुदे वा नसुदे) त्या सर्व संस्थांना देणगीरुपात दिले जाईल. दरवर्षी बालिका आदर्श शाळेतील 25 मुलींच्या शाळेची फी भरण्याची सोय त्यांनी 15 वर्षांपासून केलेली आहे. या देणगीबद्दल सर्व संस्थांनी आशा रतनजी यांना धन्यवाद दिले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विविध संस्थांना भरघोस देणगी; बचत केलीली पेन्शन संस्थांना

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm