उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार केतकी सिंह यांनी अजब विधान केलं आहे. त्यांनी बलियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र वॉर्ड बनवण्याची मागणी केली आहे. जर त्यांना आपल्या सणांची अडचण आहे, तर त्यांना आपल्या उपचारांचीही अडचण असेल, असं त्या म्हणाल्या. बलियामध्ये जे नवं हॉस्पिटल तयार होतंय, तिथे दिवाळीतच वेगळा वॉर्ड बनवला गेला पाहिजे, असंही त्या पुढे म्हणाल्या.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
BJP MLA Ketki Singh | Ballia Medical Collegeकेतकी सिंह यांनी म्हटलं की, मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लिम समाजातील रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड बनवला पाहिजे. मुसलमान समाजाला होळी, रामनवमी, दुर्गा पूजेला अडचण होते. कदाचित त्यांना आपल्याबरोबर उपचार घ्यायलाही अडचणी येत असतील. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेगळा वॉर्ड बनवला पाहिजे, जेणेकरून मुस्लीम समाजातील रुग्ण त्या वॉर्डमध्ये जाऊन उपचार करतील. मुस्लिमांसाठी रुग्णालयात वेगळा वॉर्ड असला तर आम्हीही सुरक्षित राहू. माहीत नाही कोण आपल्या जेवणात थुंकून जाईल.”
केतकी सिंह यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भोजपुरीत भाषण केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्यांचं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. केतकी सिंह यांनी 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे गोविंद चौधरी यांना हरवलं होतं. केतकी सिंह यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून भाजपाने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
