• Facebook
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Twitter
IMG-20180602-WA0000-1067x800.jpg | नेहरूनगर येथे युवकाची हत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर
02062018_545151.jpeg | नेहरूनगर येथे युवकाची हत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

नेहरूनगर येथे युवकाची हत्या

शनिवारी सकाळी नेहरु नगर येथील पी.के. कॉलनीमध्ये युवकाची धारदार शस्त्राने हत्या करून टाकण्यात आली असल्याची घटना घडली आहे.

गणेश उर्फ बसवराज (वय 21) नेहरूनगर
येथील रहिवासी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेशची हत्या करून त्याचे शरीर त्याच्या घराजवळ फेकलेले होते.
शुक्रवारी रात्री मित्राचा फोन आल्याने घराबाहेर पडलेला गणेश परतला नाहीच.
रात्री कॅमेरा च्या कारणावरून मित्रांमध्ये भांडण झाल्याचे समजले जात आहे
व यातूनच हि घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गणेश हा मूळचा गोकाक तालुक्यातील नेलगट्टी येथील असून तो नेहरूनगर येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होता.
त्याच्या छातीवर व पोटावर धारदार शस्त्राने वर केलेले आहेत.
त्याचा खून दुसऱ्या ठिकाणी करून फक्त मृतदेह नेहरूनगर येथे टाकल्याचा संशय पोलिसांनी केला आहे.

खून का झाला याचे नेमके कारण अजून समजले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
केवळ 1500 रुपयांसाठी चाकूने भोसकून आपल्या मित्राचा खून केल्याच्या आरोपावरुन एपीएमसी पोलिसांनी शनिवारी सूरज शिवाजी शिंदे (वय 24, रा. सदाशिवनगर), मनोज सिद्धाप्पा नेसरकर (वय 22, रा. नेहरुनगर) यांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
त्यांच्यावर भा.दं.वि. 341, 323, 504, 506, 302 सहकलम 34 बरोबरच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.