• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_452
news_452

पांगूळ गल्लीचे रुंदीकरण 30 फूट होणार.... दिवाळीनंतर कामाला सुरुवात

पांगूळ गल्लीचे रुंदीकरण 30 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दि. 27 रोजी मार्किंग आणि दिवाळीनंतर रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे.

रस्ता रुंदीकरण 30 फूट की 40 फूट याबाबत चर्चा करण्यात आली. तर सदर रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत व्यापारी, इमारतधारक आणि व्यायसायिकांची बैठक झाली असून तीस फूट रस्ता रुंदीकरण करण्यास नागरिकांनी सहकार्य दर्शविले. येथील इमारतधारकांना रस्त्याकरिता 30 फूट जागा सोडण्याची अट घालून इमारत बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. यानुसार नागरिकांनी घरे बांधली आहेत. यामुळे 30 फूट रस्ता रुंदीकरण करण्यास मालमत्ताधारकांनी कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले.

महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि मालमत्ताधारकांची संयुक्त बैठक आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात बोलाविण्यात आली होती. यावेळी मालमत्ताधारकांशी चर्चा करण्यात आली. रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्ली, कडोलकर गल्ली, पांगूळ गल्ली, कलमठ रोड, भेंडीबाजार अशा विविध गल्लीतील रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.
नागरिकांवर अन्याय होणार नाही याचा विचार करून नुकसानभरपाई देण्याची सूचना अधिकाऱयांना केली. तसेच शहराच्या विकासाकरिता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले.

आतापर्यंत ज्या ठिकाणी मास्टरप्लॅन राबविण्यात आले आहे व ज्या मालमत्ताधारकांचे नुकसान झाले त्यांना नुकसानभरपाई देण्याची विनंती माजी महापौर सरिता पाटील यांनी केली. तसेच ज्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, त्याचे पुनर्वसन करण्याची मागणी केली.
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
27-Oct-2018
448
बेळगाव development