• Facebook
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Twitter
01112018_3566.jpg | मराठी युवकांवर पोलिसांचा लाठीमार... सीमाभागातील आंदोलनाला गालबोट लागले... | belgaum news | belgavkar बेळगावकर

मराठी युवकांवर पोलिसांचा लाठीमार... सीमाभागातील आंदोलनाला गालबोट लागले...

दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे निघणार्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत काही युवकांनी लाल पिवळ्या झेंड्यासह प्रवेश केला. त्याला प्रथम पोलीसांनी अडवुन हाकलुन लावले. तरीही त्या युवकांचा माज उतरला नाही. त्यामुळे मराठी युवक जातीन पुढे येवुन प्रतिकार करण्यासाठी धावत आले असता त्या मराठी युवकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गोवावेस सर्कल येथे दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 

१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषिक भाग आणि ८१४ गावे कर्नाटकमध्ये टाकण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. 

काळा दिन सायकल फेरीतील कार्यकर्ते गोवावेस येथुन मराठा मंगल कार्यालयात होणाऱ्या जाहीर सभेत भाग घेण्यासाठी जात होते.
त्यावेळी काही युवक गाडीवरुन लाल पिवळ्या झेंड्यासह फेरीच्या ठिकाणी दाखल झाले.
व पोलीसांनी लाठीमार केला.